|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » शरापोव्हाची सलामी रूमानियाच्या हॅलेपविरुद्ध

शरापोव्हाची सलामी रूमानियाच्या हॅलेपविरुद्ध 

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

येथे 28 ऑगस्टपासून खेळविल्या जाणाऱया अमेरिकन खुल्या ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉमध्ये रशियाच्या शरापोव्हाची महिला एकेरीतील पहिल्या फेरीत रूमानियाच्या हॅलेपशी गाठ पडणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील विद्यमान विजेती जर्मनीची केरबर्रचा सलामीचा सामना जपानच्या ओसाकाशी होणार आहे. पुरूष विभागात फेडरर, जोकोव्हिक, निशीकोरी आणि रेओनिक हे दुखापतीमुळे सहभागी होवू शकणार नाहीत.

जर्मनीच्या केरबर्रने गेल्यावर्षी या स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले होते. यावेळी केरबर्रची सलामीची लढत जपानच्या ओसाकाशी होणार आहे. केरबर्रने पहिली फेरी जिंकली तर तिची पुढील फेरीत गाठ कदाचित स्विटोलिनाशी पडू शकेल. रशियाच्या शरापोव्हाचे ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील पुनरागमन ठरणार आहे. तिचा पहिल्या फेरीतील सामना रूमानियाच्या कडव्या हॅलेपशी हेणार आहे. झेकच्या प्लिसकोव्हाचा पहिल्या फेरीतील सामना पोलंडच्या लिनेटीशी होणार आहे.

पुरूष एकेरीचा ड्रॉ काढण्यात आला. पुरूष विभागात अनेक अव्वल टेनिसपटू दुखापतीमुळे या स्पधेत सहभागी होवू शकणार नाहीत.

ताज्या एटीपी मानांकनातील पहिल्या अकरापैकी चार टेनिसपटू या स्पर्धेत भाग घेणार नाहीत. त्यामुळे स्वित्झर्लंडच्या फेडररला जेतेपदाची संधी अधिक मिळू शकेल. जर्मनीचा चौथा सीडेड ऍलेक्सझांडेर व्हेरेव्ह अनपेक्षित धक्का देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर स्पर्धा 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान खेळविली जाईल. फेडरर आणि स्पेनचा नादाल यांच्यात  उपांत्य फेरीत गाठ अपेक्षित आहे.