|Saturday, March 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘अ.ब.क.’ मध्ये महिला सक्षमीकरणाचे स्फूर्तिगीत

‘अ.ब.क.’ मध्ये महिला सक्षमीकरणाचे स्फूर्तिगीत 

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित ‘अ. ब. क.’ या बहुचर्चित चित्रपटातील स्फूर्तिगीताचा लोकार्पण सोहळा नुकताच आर्ट ऑफ लिविंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याहस्ते पार पडला. या सोहळ्यास पॉन्डिचेरीच्या राज्यपाल किरण बेदी आणि अमफता देवेंद्र फडणवीस उपस्थित होत्या.

महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून, प्रत्येक भारतीयाने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाचा एक भाग बनला पाहिजे. मुलगा आणि मुलगी असा भेद विसरून आपण मुलींच्या विकासासाठी कटिबद्ध झालो पाहिजे, असे मत श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी चित्रपटासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ हा विषय निवडला त्याबद्दल श्री श्रीनीं त्यांचे विशेष कौतुक केले. राज्यपाल किरण बेदी भाषणात म्हणाल्या, एक कतफ&त्ववान महिलाच कर्तृत्ववान पुरुषाला जन्म देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने महिलांच्या विकासाचा आणि तिच्या प्रगतीचा ध्यास घ्यायला हवा. मुलगी शिकली प्रगती झाली एवढे म्हणून चालणार नाही तर मुलींच्या शिक्षणासाठी सर्वांनी हातभार लावायला हवा. त्याचबरोबर याप्रसंगी अमफता फडणवीस आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, आज मुलींचा टक्का कमी होत चालला असून ही चिंतेची बाब आहे. अ.ब.क.सारख्या चित्रपटातून प्रबोधन झाल्यास महिला सबलीकरणास चालना मिळू शकेल. पेटून उठू दे आज एक ज्वाला, हे अश्विनी शेंडे यांचे मराठी तर बंद थे जो बंद थे, जो मुझमें सारे, खुल गये हैं हे शामराज दत्ता यांचे हिंदी गीत प्रसिद्ध संगीतकार बापी-टूटूल यांनी संगीतबद्ध केले आहे. या दोन्ही गीतांचे पार्श्वगायन अमफता फडणवीस यांनी केले आहे. यावेळी चित्रपटातील नायक ‘लायन’ फेम सनी पवार, साहिल जोशी, आर्या घारे, दीपाली बोरकर या कलावंतांसह निर्माते मिहीर कुलकर्णी, दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts: