|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विश्वशांती आणि अंहिसेसाठी क्षमा धर्म महान आहे

विश्वशांती आणि अंहिसेसाठी क्षमा धर्म महान आहे 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये दुःखापासून उत्तम क्षमा, व्रते व शील हे रक्षण करणारी आहे. जगामध्ये उत्तम क्षमाशील मनुष्याला सर्वजण मान देतात. या उलट क्रोध, काषायधर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचा नाश करणारा आहे, असे मौलिक विचार प.पू. मुनिश्री 108 नियमसागरजी महाराज यांनी मांडले, श्री 1008 आदिनाथ दिंगबर जैन ट्रस्ट शाहूनगर यांच्यावतीने दक्षिण भारतातील भव्य 23 फूटी समवसरणामध्ये ऐतिहासिक पंचत्रदषीराज पावन संयम वर्षायोग 2017 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प.पू. मुनिश्री श्री 108 श्री नियमसागर महाराज दशलक्ष पर्वकाळातील पहिला धर्म उत्तम क्षमा या विषयावर श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करीत होते.

ते पुढे म्हणाले कि, मनुष्याने वैरभाव विसरावा, विचाराच्या माध्यमातून एकमेकात प्रेम, बंधुता सामाजिक सलोखा टिकावावा. देव, मुनष्य आणि तीर्यंचाकडून घोर उपसर्ग झाला असतानाही जे मुनी क्रोधाने संतप्त होत नाहीत त्यांची निर्मळ क्षमा असते. आपल्या मनामध्ये क्रोधभाव उत्पन्न होऊ देत नाहीत तेच मुनी उत्तम क्षमेचे धारक आहेत. शास्त्रामध्ये अशा क्षमाशील मुनीच्या अनेक कथा उपलब्ध आहेत. विश्वशांती व अहिंसासाठी क्षमा धर्म महान आहे. याचे मनुष्याने पालन केल्यास त्याचे कल्याण होईल.

शहराजवळील मौजे संभाजीपूर मधील पद्मावती हौसिंग सोसायटीत भव्य उभारण्यात आलेल्या सभा मंडपात मोठय़ा उत्साहात आणि मंगलमय वातावरणात सोहळा सुरू आहे. सोहळ्यास गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रसह संपूर्ण भारतातील श्रावक-श्राविकांचा सहभाग आहे. सभा मंडपात नोपी दैनंदिन कार्यक्रमात साडे चार हजार श्रावक श्राविकांनी भाग घेतला आहे. सकाळच्या सत्रात पूजा व  मुनीश्रींचे मंगल प्रवचन, दुपारी प्रवचन, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर आरती असे कार्यक्रम संपन्न होत आहेत. सोहळा शिस्तबध्द पद्धतीने पार पाडण्यासाठी पंधरा कमिटय़ांमार्फत नेटके नियोजन करण्यात आले आहे. बाहेर गावाच्या लोकांची राहण्याची व भोजणाची व्यवस्था केली आहे.

या महोत्सवास आचार्य श्री 108 प.पू. विद्यासागर महाराज यांचे पावन सानिध्य लाभले असून त्यांचे शिष्य मुनिश्री 108 श्री नियमसागर महाराज, प.पू. 108 प्रबोधसागर महाराज, प.पू. 108 वृषभसागर महाराज, प.पू. 108 अभिनंदन सागर महाराज, प.पू. 108 सुपार्श्वसागर महाराज हे उपस्थित आहेत.

या दशलक्षण पर्वाच्या समाप्ती निमित्त शनिवार 9 सप्टेंबर रोजी 108 घोडे, अकरा बगी, अकरा रथ, अकरा बँड पथक, पाच हत्ती, चार झांज पथक अशा स्वरूपात भव्य मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक सोहळ्यातील आकर्षण राहणार आहे. या सोहळ्यासाठी अजित भैय्या हे निवेदक म्हणून काम पाहत आहेत. संगीतकाराच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचा सर्वजण आनंद लुटत आहेत.

 सोहळ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून मुनीश्रींचे शुभाशीर्वाद घेत आहेत. तसेच दानशूरांनी आपल्या मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी, शाहूनगर, संभाजीपूर परिसरातील सर्व श्रावक, श्राविका, महिला मंडळ, युवा मंडळे, वीर सेवा दल, स्वयंसेवक, सर्व जेष्ठ नागरीक विशेष परिश्रम घेत आहेत.

 

Related posts: