|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अति मद्यसेवनामुळे दोघांचा मृत्यू?

अति मद्यसेवनामुळे दोघांचा मृत्यू? 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

साखरपा-भडकंबा येथे दोघांचा अचानक मृत्यू व एकजण गंभीर असल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. अति मद्यसेवनाने हा मृत्यू ओढवल्याची परिसरात चर्चा करण्यात येत आहे. यातील एकाचा मृत्यू लिव्हर फुटून झाल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी परिसरात याविषयी चर्चा करण्यात येत होती.

   काशीनाथ रघुनाथ कनावजे (53, भडकंबा, संगमेश्वर), गजानन पवार (82) अशी दोघा मृतांची नावे आहेत. अन्य एकजणही यामध्ये गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. साखरपा-भडकंबा येथे ही घटना घडली. तिघांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रत्नागिरीत आणण्यासाठी वेगाने हालचाल करण्यात आली. दरम्यान एकाचा वाटेत मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर असल्याचे समजते.

काशीनाथ कनावजे यांचा मृत्यू शहरातील एका खासगी रूग्णालयात झाला. यानंतर त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय सूत्रांनी त्यांचा मृत्यू लिव्हर फुटून झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, गजानन पवार यांचा मृत्यू कोणत्या कारणातून झाला व अन्य एकजण कशामुळे गंभीर आहे, हे रविवारी सायंकाळी ऊशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस या घटनेविषयी अधिक तपास करत आहेत.

 

Related posts: