|Wednesday, June 20, 2018
You are here: Home » क्रिडा » ऍक्सेलसेनचे बालपणीचे स्वप्न साकार

ऍक्सेलसेनचे बालपणीचे स्वप्न साकार 

वृत्तसंस्था / ग्लासगो

रविवारी झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीचे सुवर्णपदक मिळविणारा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू व्हिक्टर ऍक्सेलसेनचे बालपणीचे स्वप्न अखेर साकार झाले. आंतराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये अव्वल समजल्या जाणाऱया लिन डॅनचा पराभव करण्याचे ऍक्सेलसेनचे लहानपणीचे स्वप्न होते. ऍक्सेलसेनने पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 33 वर्षीय लिन डॅनचा 22-20, 21-16 असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात पुरूष एकेरीचे विजेतेपद मिळविणारा ऍक्सेलसेन हा डेन्मार्कचा तिसरा बॅडमिंटनपटू आहे. यापूर्वी म्हणजे 1977 साली झालेल्या पहिल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कच्या फ्लेमिंग डेल्फसने तर 1997 साली ग्लॅस्गोत डेन्मार्कच्या पीटर रासमुसेनने विजेतेपद मिळविले होते. 2014 च्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत ऍक्सेलसेनने कास्यपदक तर 2016 च्या ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते.

रविवारी झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या चेंग आणि नेन यांनी पुरूष दुहेरीचे सुवर्णपदक पटकाविले. चीनच्या जोडीने अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान आणि सेपुट्रो यांचा 21-10, 21-17 असा पराभव केला. चीनच्या चेन क्विंगचेन आणि यिफेन यांनी महिला दुहेरीचे सुवर्णपदक मिळविताना जपानच्या फुकुशिमा आणि हिरोता यांचा 21-18, 17-21, 21-15 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या टोनटोवी अहमद व लिलियाना नात्सिर यांनी चीनच्या जोडीवर मात करून जेतेपद पटकावले.

Related posts: