|Monday, October 15, 2018
You are here: Home » Automobiles » यामाहाची नवी रेसिंग सुपरबाइक लाँच

यामाहाची नवी रेसिंग सुपरबाइक लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी यामाहा रेसिंगने खास आपल्या वाहनप्रेमी ग्राहकांसाठी आपली नवी WR450F Rally Replica लाँच केली आहे. या नव्या रेसिंग बाइकमध्ये अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत. या नव्या बाइकच्या किमतीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – या बाइकमध्ये 449 सीसीचे सिंगल सिलिंडर 4 स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे.

– ट्रान्समिशन – 5 स्पीड ट्रान्समिशन

– सस्पेन्शन – स्पोर्टस् टेलिस्कोपिक प्रंट फॉर्क्स आणि रिअरमध्ये लिंक सस्पेन्शन देण्यात आले आहेत.

– व्हिल – 21 इंच प्रंट व्हिल आणि 18 इंच रिअर व्हिल देण्यात आल sआहेत.

– इंधन क्षमता – 31 लिटर इंधन स्टोरेज क्षमता असणारा फ्यूल टँक देण्यात आला आहे.

– ब्रेकींग सिस्टिम – 290 एमएमचे प्रंट डिस्क बेक आणि 245 एमएमचा रिअर ब्रेक्स देण्यात आले आहेत

Related posts: