|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » Top News » अमित शहांच्या भेटीनंतर खट्टर यांचा राजीनाम्यास नकार

अमित शहांच्या भेटीनंतर खट्टर यांचा राजीनाम्यास नकार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान खट्टर यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली. त्यामुळे खट्टर यांनी राजीनाम्यास नकार दिला असल्याची माहिती मिळत आहे.

गुरमीत राम रहिम याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हरियाणा, पंजाबसह इतर काही राज्यांत प्रंचड हिंसाचार झाला. या हिंसाचारात 30 हून अनेकांचा जीव गेला. या सर्व प्रकारामुळे राज्य सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत होत्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींनंतर खट्टर यांनी अमित शहांची भेट घेत परिस्थितीचा आढावा सादर केला. या उभय नेत्यांच्या भेटीनंतर खट्टर हेच मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील, अशी माहिती मिळत आहे.

Related posts: