|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कारावर कुरतडे नं.1 ची छाप!

‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कारावर कुरतडे नं.1 ची छाप! 

देशभरातील निवड झालेल्या 172 शाळांमध्ये समावेश

1 सप्टेंबर रोजी होणार दिल्लीत वितरण

प्रतिनिधी /रत्नागिरी

केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या उपक्रमांतर्गंत ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कारासाठी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद कुरतडे नं. 1 शाळेची निवड करण्यात आली आहे.

‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या उपक्रमांतर्गंत ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कारासाठी देशभरातून 172 शाळांची निवड झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे नं. 1 ची निवड झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. मानव संसाधन मंत्रालयाच्यावतीने दिला जाणारा हा पुरस्कार उद्या 1 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे दिला जाणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पवार आणि केंद्रप्रमुख उदय शिंदे तसेच एक विद्याथीं दिल्लीला जाणार आहेत.

या पुरस्कारासाठी आवश्यक असलेले स्वच्छतेचे सर्व निकष शाळेने पूर्ण केलेले आहेत. शाळेला तसेच कुरतडे गावाला अभिमानास्पद असणारा हा पुरस्कार शाळेचा उत्तरोत्तर विकास करणारा राहणार असल्याचे ग्रामस्थांकडूनही सांगितले जात आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कुरतडे येथील ग्रामस्थ, शिक्षकवृंद यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारापर्यंत मजल मारण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच कुरतडे ग्रामस्थांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे.