|Saturday, March 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘द कपिल शर्मा शो’ अखेर बंद होणार

‘द कपिल शर्मा शो’ अखेर बंद होणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कॉमेडी किंग कपिल शर्मा शो अखेर बंद होणार असल्याची घोषण सोनी टिव्हीने केली आहे. कपिल शर्माच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शोचे चित्रीकरण वारंवार रद्द केले जात होते. त्यामुळे चॅनलने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण कपिलचा हा शो कायमचा बंद होणार नाही. कपिलची तब्येत पाहता सोनी टीव्हीने त्याला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कपिल शर्मा सोनी टिव्हीवर पुन्हा कधी दिसणार हे अद्याप चॅनलने स्पष्ट केलेले नाही. आता कपिल शर्माच्या शो एवजी कृष्णा अभिषेकचा ‘द ड्रामा कंपनी’हा शो दाखवला जणार आहे. जेव्हा कपिल बरा होऊन परतेल, तेव्हा त्याच्या शोसाठी रात्री दहाचा टाईम स्लॉट दिला जाईल.

 

Related posts: