|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

3 ते 9 सप्टेंबर 2017

मेष

राहू-केतूचे राश्यांतर काही प्रमाणात अडचणी निर्माण करणार आहे. राजकीय, सामाजिक क्षैत्रात आपल्या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जाईल. खोटे आरोप होऊ शकतात, सावध रहा. आठवडय़ाची सुरुवात चांगली असणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. मात्र गुरुवारपासून नोकरी धंद्यात वाद, गैरसमज संभवतात.  कलाक्रीडा क्षेत्रात प्रकृतीची काळजी घ्या. आध्यात्मिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा. शेतीच्या कामात जास्त लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थीवर्गाला यश मिळणार आहे. वाहन जपून चालवा.


वृषभ

राहू व केतूचे राश्यांतर आत्मविश्वास वाढविणार आहे. नाटय़चित्रपट क्षेत्रात आपल्याला महत्त्वाची भूमिका मिळू शकेल. प्रसिद्धी मिळेल. कोर्टकचेरीच्या कामातील अडचणी थोडय़ा प्रमाणात कमी होतील. लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. थोरामोठय़ांच्या सल्ल्याने निर्णय घेतल्यास धंद्यात अधिक फायदा संभवतो. नोकरीत बदल हवा असेल तर आताच करून घ्या. पुढे संधी मिळणे थोडे अवघड आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले डावपेच यशस्वी ठरतील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर पडण्याची शक्मयता आहे ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा.


मिथुन

राहू कर्क राशीत व केतू मकर राशीत प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अति विश्वासाच्या बदल्यात तुम्हाला धोका मिळू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. आपण काय बोलतोय त्याकडे लक्ष ठेवा. ठोस आश्वासने देऊ नका. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्य विचार घर करतील. गोंधळून जाऊ नका. नियमितपणे आपले कार्य चालू ठेवा. देवाची आराधना केली तर मार्ग सापडेल. विद्यार्थी वर्गाला कष्ट घेण्याची गरज आहे. जमिनीच्या व्यवहारात सावध रहा. मेहनत केली तरी फळ न मिळाल्यामुळे उदास वाटेल. मात्र काळजी करू नका. पुढे मोठे यश मिळणार आहे.


कर्क

सप्ताहात तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढेल. धंद्यात जम बसेल. चांगला फायदा होईल. स्वराशीत राहू व मकरेत केतू प्रवेश करीत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुखापत व तणाव वाढण्याची शक्मयता आहे. सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. राजकीय कामांना वेग येईल. सर्वत्र तुमच्या नावाचा बोलबाला होईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. नवे काम मिळेल व प्रसिद्धी मिळेल. संसारात मोठी खरेदी करण्याचा विचार होईल.


सिंह

कर्क राशीत राहू व मकरेत केतू प्रवेश करीत आहे. या सप्ताहात मनावर मोठे दडपण येण्याची शक्मयता आहे. कुटुंबात चिंताजनक घटना घडू शकते. वाटाघाटीत तणाव होईल. धंद्यात काम मिळेल. मजूर वर्गाला सांभाळणे कठीण वाटेल. राजकीय- सामाजिक क्षेत्रात सहकारी वर्गाचे सहाय्य कमी मिळेल. त्यामुळे गैरसमज व दुरावा वाढेल. स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यसनाने प्रकृतीवर परिणाम होईल. मान-सन्मान मिळेल. तरीही मनाचा उत्साह कमी पडेल.


कन्या

राजकीय-सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरुपाच्या घटना घडतील. अनंतचतुर्दशीच्या दिवशी वरि÷ांची नाराजी होईल. शत्रुत्व वाढेल. कर्केत राहू व मकरेत केतू प्रवेश करीत आहे. संसारात मुले व इतरांचे सहकार्य मिळेल. मान प्रति÷ा मिळेल, परंतु टिकात्मक चर्चा होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. तुमच्या कामात चुका होण्याची शक्मयता आहे. शैक्षणिक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल. गुप्त कारवायांना थांबवणे कठीण होईल. धंद्यात नुकसान टाळण्यासाठी लक्ष द्या.


तूळ

साडेसातीचा अत्यंत थोडासा भाग उरला आहे. प्रगतीच्या अनेक संधी तुमच्याकडे येतील. मकरेत केतू व कर्केत राहू प्रवेश करीत आहे. तुम्ही त्याची चिंता न करता प्रयत्न व जिद्द ठेवा. अनंतचतुर्दशीला शुभ समाचार मिळेल. राजकीय- सामाजिक कार्यात वरि÷ तुमच्या कामावर खूष होतील. गुरुवार, शुक्रवार विरोध होईल. शत्रुत्व वाढवू नका. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक व पैसा मिळेल. थोरा मोठय़ांच्याकडून मोठे आश्वासन मिळेल.


वृश्चिक

साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. वृश्चिकेच्या पराक्रमात केतू व भाग्यात राहू प्रवेश करीत आहे. किरकोळ अडचणी येतील. क्षुल्लक विरोधाला कमी लेखू नका व व्यक्तीला दुखवू नका. या सप्ताहात महत्त्वाचे निर्णय राजकीय, सामाजिक कार्यात घेता येतील. प्रसिद्धी मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढेल. अनंत चतुर्दशीला गैरसमज होऊ शकतो. संसारात जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. विवाहासाठी योग्य स्थळ मिळेल. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करा. नोकरी धंद्यात प्रगती होईल. कोर्टकेस लवकर संपवा.


धनु

मकरेत केतु व कर्केत राहू प्रवेश करीत आहे. या सप्ताहात तुम्ही ठरविलेल्या कार्यक्रमात यश मिळेल. जवळच्या व्यक्तीच्या विषयी चिंता वाढेल. खर्च होईल. खाण्याची स्वत:ची काळजी घ्या. कौटुंबिक वाटाघाटीसाठी तुम्ही पुढाकार घ्यावा, असा आग्रह होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. तुमच्यावरील आरोप दूर करता येतील. नोकरीत वरि÷ांच्या समवेत रहावे लागेल. धंद्यात फायदा होईल. मैत्रीत दुरावा संभवतो. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. शिक्षणात पुढे जाऊन प्रगती होईल.


मकर

मकरेच्या सप्तमात राहू व स्वराशीत केतू प्रवेश करीत आहे. तुमच्या क्षेत्रातील कार्यावर याचा विपरित परिणाम होणार नाही. राजकीय क्षेत्रात आत्मविश्वासाने कार्य होईल. दौऱयात यश मिळेल. कुठेही अतिशयोक्ती करून चालणार नाही. सामाजिक कार्यात लोकप्रियता मिळेल. टिकात्मक चर्चा होईल. तुमचा संताप वाढू शकतो.त् यावर संयम ठेवा. शेतकरी वर्गाला यश मिळेल. पेरणी होईल. पीक वाढेल. धंद्यात तात्पुरता व्यवहार ठेवा. कोर्टाच्या कामात सावध रहा. प्रति÷ा धोक्मयात टाकू नका.


कुंभ

सोमवार, मंगळवार कुटुंबात मतभेद होतील. धावाधाव वाढू शकते. प्रकृतीची काळजी घ्या. मुलांच्या भविष्याविषयी काळजी वाटेल. मकरेत केतू व कर्केत राहू प्रवेश करीत आहे. अनंतचतुर्दशीच्या दिवसापासून मनावरील ताण कमी होईल. चिंतन करा. चिंता नको. ग्रहांचे भ्रमण बदलत असते. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. तुमच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होईल. मोठय़ा लोकांचा सहवास मिळेल. जवळचे लोक हेवा करतील. जमिन खरेदी, विक्रीत लाभ संभवतो. शिक्षणासाठी प्रवेश मिळेल.


मीन

गुप्त कारवायांचा त्रास कमी होईल. मान-सन्मानाचा योग येईल. राजकीय-सामाजिक कार्यात पदाधिकार मिळेल. तुमच्या कामांबरोबर स्पर्धा करणारे लोक वाढतील. मकरेत केतू व कर्केत राहू प्रवेश करीत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शत्रुत्व वाढेल. सावध रहा. व्यसनाने नुकसान होईल. अरेरावी करू नका. पोलीस केस होऊ शकते. धंद्यात फायदा होईल. स्वत: लक्ष द्या. संसारात सर्वांचे साहाय्य मिळेल. प्रेमप्रकरण रेंगाळत न ठेवता योग्य दिशा द्या. शिक्षणात मेहनत घ्या. मोठे यश मिळेल.  कोर्टकेसमध्ये अहंकाराने वागू नका.

Related posts: