|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रकाश वेळीप यांच्या वाढदिवसानिमित्त 5 रोजी बाळ्ळी येथे विविध कार्यक्रम

प्रकाश वेळीप यांच्या वाढदिवसानिमित्त 5 रोजी बाळ्ळी येथे विविध कार्यक्रम 

वार्ताहर/ केपे

माजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप यांचा 5 रोजी वाढदिवस असून त्याचे औचित्य साधून आदर्श कृषी सहकारी संस्थेतर्फे महिलांकरिता आरोग्य शिबिर, शेतकरी मेळावा व गौरव, विद्यार्थी तसेच शिक्षकांचा गौरव आणि इतर विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत, अशी माहिती शनिवारी केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या पदाधिकाऱयांनी दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप, संचालक सतीश वेळीप, भिकरो वेळीप, लक्ष्मण वेळीप, अनंतर गावकर यांची उपस्थिती होती. 5 रोजी शिक्षकदिन तसेच प्रकाश वेळीप यांचा वाढदिवसही असून त्यानिमित्त सकाळी 9 वा. महिलांकरिता आरोग्य शिबिर होईल. या शिबिराचे उद्घाटन खासदार विनय तेंडुलकर यांच्या हस्ते होणार आहे. 11 वा. शेतकरी मेळावा असून त्याचे उद्घाटन आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे, खासदार नरेंद्र सावईकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.

यावेळी 12 उत्कृष्ट शेतकऱयांचा तसेच यंदाच्या दहावी, बारावी व पदवी परीक्षांत घवघवीत यश संपादन केलेल्या 27 विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. त्याशिवाय शिक्षक दिनानिमित्त रतन महाले व सोलाज रॉड्रिग्स या दोन शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कर्मचारी या नात्याने स्नेहा रायकर यांना गौरविण्यात येईल. याशिवाय प्रकाश शंकर वेळीप ट्रस्टतर्फे देण्यात येणारा पुरस्कार यंदा नामदेव फातर्पेकर यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत प्रकाश वेळीप यांनी दिली.

हा कार्यक्रम आंचल भवन, बाळ्ळी येथे होणार असून सर्वांनी हजर राहावे, असे आवाहन सतीश वेळीप यांनी केले. ऍग्रो कॉम्प्लेक्स, डेअरी, सेंद्रीय नारळ, शैक्षणिक उपक्रम यासारखे अनेक उपक्रम संस्थेतर्फे येणाऱया काळात राबविले जाणार आहेत, असे याप्रसंगी वेळीप यांनी स्पष्ट केले.

Related posts: