|Wednesday, June 20, 2018
You are here: Home » Top News » संरक्षणमंत्रिपदी निर्मला सीतारमन

संरक्षणमंत्रिपदी निर्मला सीतारमन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार आज करण्यात आला. यामध्ये संरक्षणमंत्रिपदी निर्मला सीतारमन यांची नियुक्ती करण्यात आली असून, सुरेश प्रभूंना वाणिज्य खात्याचा पदभार देण्यात आला आहे.

कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तारात सध्याच्या काही राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. तसेच विद्यमान मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. यामध्ये वस्त्राsद्योग मंत्री स्मृती इराणी यांना सूचना आणि प्रसारण मंत्रालय, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कौशल्यविकास मंत्रालय, उर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रालय तर याशिवाय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना गंगा जल संधारण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Related posts: