|Thursday, December 13, 2018
You are here: Home » leadingnews » एनडीएचा मृत्यू झाला, आघाडी कागदापुरतीच ; संजय राऊतांची टीका

एनडीएचा मृत्यू झाला, आघाडी कागदापुरतीच ; संजय राऊतांची टीका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भाजपला फक्त विधेयक मंजूर करताना आणि निवडणुका जवळ आल्यावरच एनडीएची आठवण होते. एनडीए कागदापुरती आणि बैठकांपुरतीच उरली आहे. एनडीएचा मृत्यू झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आज राष्ट्रपती भवनात पार पडला. या विस्तारामध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या वाटय़ाला एकही मंत्रिपद आले नाही. तसेच या विस्तारात उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेने आपली नाराजी व्यक्त केली. राऊत म्हणाले, मंत्रिपदासाठी आम्ही हापापलो नाही. वेळ आल्यावर आम्ही आमचे म्हणणे मांडू, शिवसेनेचे सर्व नेते सध्या मुंबईत कामात व्यस्त आहेत. भाजपला फक्त विधेयक मंजूर करताना आणि निवडणुका जवळ आल्यावरच एनडीएची आठवण होते. एनडीए कागदापुरती आणि बैठकांपुरतीच उरली आहे.

Related posts: