|Saturday, March 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » राहुल-अंजलीची लग्नानंतरची लव्हस्टोरी ‘तुला कळणार नाही’

राहुल-अंजलीची लग्नानंतरची लव्हस्टोरी ‘तुला कळणार नाही’ 

बॉलीवूडच्या प्रेमकथेतील सर्वात रोमँटिक जोडी असणारी राहुल-अंजली हे पात्र लवकरच मराठीत येत आहे. ‘तुला कळणार नाही’ या आगामी सिनेमातून त्यांची लग्नानंतरची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने हा सिनेमा 8 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी सिनेसफष्टीत रोमँटिक चित्रपटांचा नवा पायंडा घालणारी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत असून, श्रेया कदम, अर्जुनसिंग बरन आणि कार्तिक निशानदार यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. 

नवरा-बायकोच्या नात्यात एक अजब रसायन असते. ज्यात प्रेमाचा गोडवा, नात्याचा ओलावा आणि जबाबदारीचा तिखटपणाही असतो. नुकतेच या सिनेमाच्या पोस्टर आणि शीर्षक गीताचे सांताक्रुझ येथील लाईटबॉक्समध्ये अनावरण करण्यात आले. वैवाहिक दाम्पत्यांवर आधारित हा सिनेमा असल्यामुळे, चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत स्वप्नील आणि लीना या जोशी दाम्पत्यांनी सिनेमाचे शीर्षक गीत लॉंच केले. मोडीत निघालेल्या ओढीची… गोष्ट वेडय़ा जोडीची… असे सबटायटल असलेल्या या पोस्टरवर सुबोध आणि सोनालीला बांधले असल्याचे दिसून येत असून, प्रत्येक घराघरातील नवरा बायकोची केमिस्ट्री आपल्याला यात पहायला मिळते. सिनेमाच्या शीर्षकगीतामध्येही हीच केमिस्ट्री दिसून येते. शीर्षकगीतचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, संगीतदिग्दर्शन अमितराज याचे आहे. स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांचा आवाज लाभला आहे.

 

Related posts: