|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संघटीतपणामध्येच संस्थेचा खरा उत्कर्ष

संघटीतपणामध्येच संस्थेचा खरा उत्कर्ष 

वार्ताहर / दाभाळ

कुठलीही संस्था सुरु करणे सोपे असते. पण ती सातत्याने कार्यरत ठेवणे तेवढेच अवघड असते. संस्था चालकांनी आपल्या सामाजिक उद्दिष्ठय़ापासून न ढळता संघटितपणे कार्य केल्यास समाजाप्रती अशी संस्था आदर्श ठरत असते, असे प्रतिपादन खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केली.

बेतोडा येथील शिवपंचायतन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, सरपंच सुशांत गावकर, उपसरपंच मंदा गावडे, पंचसदस्य जान्हवी गावकर, मंडळाचे अध्यक्ष उमेश गावडे, सचिव प्रसाद प्रभूगावकर, खजिनदार पाश्कोल रॉड्रगीस, रयानी समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सलीम रयानी आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाने क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे सुभाष शिरोडकर यावेळी बोलताना म्हणाले. सुशांत गावकर व जान्हवी गावकर यांची यावेळी भाषणे झाली. मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पाहुण्यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. दहावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मंडळाच्या कार्यात योगदान दिलेल्या अंकुश सतरकर, महादेव गावकर व प्रसाद प्रभूगावकर यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे.

वेशभूषा स्पर्धा- श्रेयश देसाई, पूर्वी कोरडे, विधी देसाई. नृत्य स्पर्धा – साईशा देसाई, श्रेया देसाई, कनिष्का गावडे. स्वागत व प्रास्ताविक प्रसाद प्रभूगावकर यांनी केले. उमेश गावडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. हेमंत सामंत यांनी सूत्रसंचालन तर नित्यानंद नाईक यांनी आभार मानले.