|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विद्युत तारेला स्पर्शाने वृद्ध गंभीर

विद्युत तारेला स्पर्शाने वृद्ध गंभीर 

प्रतिनिधी/ निपाणी

निपाणीत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने वृद्ध गंभीर झाल्याची घटना रविवारी दुपारी 4 वाजता बेळगाव नाका येथे घडली. शिवाजी जानू गुरव (रा. पांगिरे बी) असे या वृद्धाचे नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.

 याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बेळगाव नाका येथे रविवारी सकाळी हमाल संघटनेचे उद्घाटन करण्यात येणार होते. त्या कार्यक्रमासाठी शिवाजी गुरव हे आले होते. ते वर गॅलरीत उभारले असता नकळत हाताचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ते गॅलरीतच कोसळले. तेथील नागरिकांचे लक्ष गेल्यानंतर त्यांना निपाणी येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.

 निर्मळे हॉस्पिटल येथे नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर व त्यांच्या सहकाऱयांनी भेट देऊन गुरव यांची विचारपूस केली. तसेच निपाणी शहर पोलिसांनी भेट दिली. यावेळी हमाल संघटनेच्या सदस्यांनी दवाखान्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

रुग्णवाहिका उशिरा आल्याने नाराजी

विजेचा जोरदार धक्का बसल्याने शिवाजी गुरव यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे उपस्थितांनी तत्काळ 108 रुग्णवाहिकेला त्याची माहिती कळविण्याचा प्रयत्न केला. पण निपाणी विभागातील रुग्णवाहिका व्यग्र असल्याने चिकोडीहून रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यात बराच वेळ गेला. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत होती.

Related posts: