|Sunday, December 16, 2018
You are here: Home » विविधा » 200ची नोट एटीएममध्ये 3 महिन्यांनी मिळणार

200ची नोट एटीएममध्ये 3 महिन्यांनी मिळणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

आरबीआयने 200 रूपयांची नोट आठवडाभरापूर्वी चलनात आणली असली तरी एटीएममध्ये ती तीन महिन्यांनी मिळणार आहे. ही नोट एटीएममध्ये उपलब्ध करून देण्यासाठी या यंत्रांची मोठय़ा प्रमाणावर फेररचना करावी लागणार आहे. काही बँकांनी एटीएम कंपन्यांना या नव्या नोटेची चाचणी घेण्यास सांगितले तरी त्यांना 200च्या नोटा उपलब्ध झालेल्या नाहीत.

रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात निश्चित कालावधीत उल्लेख न करता 200 रूपयांच्या नोटांचा पुरवठा लवकरच केला जाईल, असे म्हटले आहे.एटीएम यंत्रांत 200 रूपयांच्या नोटेसाटी बदल करून घेण्यास रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला अजून आदेश आलेला नाही, असे एटीएम उत्पादक कंपन्यांनी म्हटले. बँकेकडून आम्हाला आदेश मिळाला की आम्ही यंत्रात तसा बदल करून घेऊ. असे एजीएस ट्रन्झॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे अध्यक्ष आर.बी. गोयल यांनी सांगितले.

 

Related posts: