|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सहाजणांना वाचविणाऱया तिघांचा सत्कार

सहाजणांना वाचविणाऱया तिघांचा सत्कार 

वार्ताहर / मालवण खोतजुवा येथील खाडीपात्रात बुडणाऱया सहाजणांना जीवदान देणाऱया तिघांचा येथील पंचायत समितीच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शासनाने या तिघांना शौर्यपदक देऊन गौरवावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सांगितले.

महिनाभरापूर्वी खोतजुवा येथील स्थानिक ग्रामस्थ होडीतून मसुरे येथे जात असताना अचानक होडी उलटून त्यातील सहाजण खाडीपात्रात पडले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ मुरलीधर खोत, भीमसेन खोत, लक्ष्मण खोत यांनी त्यांना वाचवत किनाऱयालगत आणले. यात सहाजणांचे जीव वाचविल्याबद्दल पंचायत समितीच्यावतीने या तिघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर, अजिंक्य पाताडे, विनोद आळवे, कमलाकर गावडे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सागरिका लाड, सोनाली कोदे, गायत्री ठाकुर, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.