|Thursday, May 23, 2019
You are here: Home » क्रिडा » आनंद विजयी, हरिकृष्ण पराभूत

आनंद विजयी, हरिकृष्ण पराभूत 

वृत्तसंस्था/ जॉर्जिया

बिलिसी, जॉर्जिया येथे सुरू असलेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताच्या विश्वनाथन आनंदने विजय मिळवित शानदार सुरुवात केली. त्याने मलेशियाच्या लि तियान येवोहवर मात केली. भारताच्या पी. हरिकृष्णला मात्र परावाला सामोरे जावे लागले.

आनंदने सर्वच विभागात चमकदार प्रदर्शन करीत लि वर विजय मिळविला. लि ने ऍलापिन ओपनिंगचा अवलंब केला. पण आनंदला समस्थिती प्राप्त करण्यात फारशी अडचण आली नाही. खेळ पुढे सरकेल तसा आनंदची बाजू किंचित वरचढ ठरत गेली. दोन मोहऱयांच्या बदल्यात लि ने वजिराचा बळी दिल्यावर तांत्रिक खेळावर त्यांना भर द्यावा लागला. आनंदचे नियंत्रण मिळविल्यावर प्रतिस्पर्ध्याचे सर्व आक्रमणे उद्ध्वस्त करीत विजय साकार केला. हरिकृष्णला क्मयुबाच्या युरी विडाल गोन्झालेसने पेट्रॉफ डिफेन्सच्या डावात पराभूत केले.

 

Related posts: