|Saturday, January 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रोहिंग्या मुस्लिमांची समस्या गंभीर

रोहिंग्या मुस्लिमांची समस्या गंभीर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतात लोकांना आश्रय देण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. सध्या भारतासमोर रोहिंग्या शरणार्थींचा मुद्दा ठाकला आहे. भारताने रोहिंग्यांना म्यानमारमध्ये परत पाठविण्याचा निर्णय घेतलाय.

न्यायालयासमोर मुद्दा

रोहिंग्या शरणार्थींना परत पाठविण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागविले. याप्रकरणी 11 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

शरणार्थी कायद्याचा अभाव

भारताने शरणार्थी विषयक संयुक्त राष्ट्र शरणार्थी करार 1951 वर स्वाक्षरी केलेली नाही. याशिवाय 1967 मध्ये झालेल्या याच्या शिष्टाचारांचा देखील भारत हिस्सा नाही. भारताने अनौपचारिक आणि वेगवेगळ्या प्रकरणांच्या हिशेबाने शरणार्थींच्या अर्जांवर निर्णय घेतले आहेत. भारताकडून आश्रयाची अनुमती मिळाल्यानंतर शरणार्थींना दीर्घकाळ व्हिसा दिला जातो, ज्याचे दरवर्षी नुतनीकरण केले जाते. याच्या मदतीने शरणार्थी रोजगार, बँकिंग आणि शिक्षण यासारख्या सुविधा मिळवू शकतात.

परत पाठविण्यामागच्या समस्या

रोहिंग्या शरणार्थींना परत पाठविण्याच्या मुद्यावर बांगलादेश आणि म्यानमारशी चर्चा करत असल्याचे भारत सरकारने सांगितले. म्यानमारच्या कायद्यानुसार रोहिंग्या त्याचे नागरिक नाहीत. अशा स्थितीत त्यांना परत पाठविण्यासाठी कोणतेच वैध ठिकाणच नसल्याने समस्या निर्माण झाली.

शरणार्थींसाठी भारत उदार

?भारतात आश्रय घेणाऱयांमध्ये तिबेटी, बांगलादेशचे चकमा शरणार्थी, अफगाणी आणि श्रीलंकेचे तमिळ सामील राहिले आहेत.

?भारतात जवळपास 1 लाख तिबेटींना आश्रय मिळाला असून ते जमीन भाडेतत्वावर घेण्यासह खासगी नोकरी करू शकतात.

?तमिळ शरणार्थींना विशेषकरून तामिळनाडूत राज्य सरकारकडून भरीव मदत मिळत आली आहे.

?2016 मध्ये अफगाण, पाक आणि बांगलादेशच्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी शरणार्थींना अनेक सुविधा मोदी सरकारने दिल्या.

 

रोहिंग्यांना परत पाठविणार

?रोहिंग्या शरणार्थींचा दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय.

?भारतीय नागरिकांच्या अधिकारांवर अतिक्रमण, सुरक्षेसाठी आव्हान.

?रोहिंग्यांमुळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक समस्येची भीती.

?भारताचा लोकसंख्या विषयक समतोल कायम राखण्याचा विचार.

Related posts: