|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारत देखील उत्तर कोरियाचा व्यापारी भागीदार

भारत देखील उत्तर कोरियाचा व्यापारी भागीदार 

उत्तर कोरियासोबतचा व्यापार रोखण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील : चीनसोबत सर्वाधिक भागीदारी

वृत्तसंस्था/ सेउल

 उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. उत्तर कोरियासोबत व्यापार करणाऱया सर्व देशांना व्यवहार थांबविण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. जर व्यापार थांबवावा लागला तर याचा फटका भारताला देखील बसेल. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आकडय़ांवर नजर ठेवणारी संस्था द ऑब्जर्व्हेटरी ऑफ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्सिटीनुसार उत्तर कोरियाकडून आयात आणि निर्यात दोन्ही प्रकरणी भारत दुसऱया स्थानावर आहे.

आयात होणारी प्रमुख उत्पादने

? रिफाइन्ड पेट्रोलियम (18.6 कोटी डॉलर्स)

? सिंथेटिक फिलामेंट धाग्याने विणलेली वस्त्रs (13.8 कोटी डॉलर्स)

? डिलिव्हरी ट्रक्स (10.8 कोटी डॉलर्स)

? सोयाबीन तेल (10.4 कोटी डॉलर्स)

 

निर्यात होणारी प्रमुख उत्पादने

?कोल ब्रिकेट
(95.2 कोटी डॉलर्स)

? टेक्सटाईल (न विणलेले कोट आणि सूट) (150.1 कोटी डॉलर्स)

3.47 अब्ज डॉलर्सची आयात

85 टक्के………….. चीन

3.1 टक्के…………. भारत

2.3 टक्के…………. रशिया

2.1 टक्के…………. थायलंड

1.5 टक्के…………. फिलीपाईन्स

1.3 टक्के…………. मेक्सिको

4.7 टक्के…………. अन्य

 

2.83 डॉलर्सची निर्यात

83 टक्के………….. चीन

3.5 टक्के…………. भारत

1.5 टक्के…………. पाकिस्तान

1.2 टक्के…………. बुर्किनो फासो

10.8 टक्के……….. अन्य