|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कारायमड्डी-काकोडा येथे फ्लॅटला आग दिड लाखाची हानी

कारायमड्डी-काकोडा येथे फ्लॅटला आग दिड लाखाची हानी 

प्रतिनिधी/ कुडचडे

कारायमड्डी-काकोडा येथील मशिदीजवळील अक्रम मंजिल या इमारतीत राहणारे रशीद वजीर सय्यद यांच्या फ्लॅटला बुधवारी दुपारी आग लागून सुमारे दीड लाखाची हानी झाली.

ही आग ‘एसा’rच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून संपूर्ण बॅडरूम आगीच्या भक्षस्थानी पडला. त्या रुममधील कपडे, लाकडी कपाटे, खुर्च्या व अन्य सामान भस्मसात झाले. या घटनेची माहिती मिळाताच कुडचडे अग्निशामक दलाचे लिडींग फायर फायटर शिवाजी फडके, उमेश आचार्य, ड्रायव्हर मारीओ फर्नांडिस तसेच मनोज गांवकर, प्रभाकर वेळीप, सिद्धार्थ मोरजकर, लाडू गावडे, वासुदेव कोमरपंत व सत्यवान गावकर यांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.

आगीचे रूप अधिक भीषण असल्यामुळे मडगावहून अतिरिक्त बंब मागविण्यात आला. पण बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग विझविण्यात आली होती. सुदैवाने कोणला इजा झाली नाही. सदर आगीत अंदाजे दीड लाखाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तर 3 लाखाची मालमत्ता वाचविण्यात दलाला यश आले. कुडचडे अग्निशामक दलाचे आधिकारी शैलेश गावडे यांनी ही माहिती दिली.