|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा पत्रकार, विविध संघटनांकडून गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध

गोवा पत्रकार, विविध संघटनांकडून गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध 

प्रतिनिधी/ पणजी

पत्रकार हे लोकशाहीत चौथ्या स्तंभाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याऐवजी परखड विचार मांडून समाजसुधारणा करणाऱयांची हत्या करुन त्यांना संपवण्याचे प्रकार अलिकडच्या काळात घडू लागले असून ही चिंताजनक गोष्ट आहे. लोकशाहीत या प्रकारांना अजिबात थारा देता नये. कट्टरवाद्यांनी एखाद्या विचारवंताची हत्या केली म्हणून त्यांचा विचार संपणार नाही. त्यातून हजारो लाखो विचारवाहक तयार होतील असा विश्वास व्यक्त करत उपस्थित सर्व वक्त्यांनी  कर्नाटक मधील जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला.

गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे पणजी येथील आझाद मैदानावर पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आयोजित निषेध सभेला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे पत्रकार मोठया संखेने उपस्थित होते.

राजन नारायण, राजू नायक, प्रकास कामत, गणेश शेटकर, कलमणी, संदेश प्रभुदेसाई, राजन गावस, निबेदिता दास आदींनी विचार मांडले, राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रा मधील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.