|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तुफान पावसाने मुरगूडचा सरपिराजी तलाव तुडूंब!

तुफान पावसाने मुरगूडचा सरपिराजी तलाव तुडूंब! 

वार्ताहर /मुरगूड :

    गूरूवारी सायंकाळी झालेल्या तुफान पावसाने मुरगूड शहरासह यमगे व शिंदेवाडी गावांना पीण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा सरपिराजी तलाव तुडूंब भरला. जुलै-ऑगस्टला ओव्हर फ्लो होणारा तलाव सप्टेबरचा पहिला आठवडा संपत आला तरी तलाव भरला नव्हता त्यामुळे या तिन्ही गावांच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याबाबत चिंता लागून राहीली होती. मात्र काल झालेल्या तुफान बरसातीमूळे तलावात येणाऱया अवचितवाडी- जांभूळखोरा चर आणि दौलतवाडी ओढय़ातून येणाऱया प्रचंड मोठय़ा प्रवाहामूळे रात्रीपर्यंत ओव्हरफ्लो होऊन कापशी रोडवरील सांडव्यातून पाणी बाहेर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान शहरानजीकच्या वेदगंगा नदीच्या पाणीपातळीतही प्रचंड वाढ होऊन तिसऱयांदा पाणी पात्राबाहेर आले आहे.

Related posts: