|Wednesday, June 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » युरोपच्या धर्तीवर वाराणसीची सुरक्षा

युरोपच्या धर्तीवर वाराणसीची सुरक्षा 

वाराणसी / वृत्तसंस्था :

गल्ल्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया वाराणसीत सुरक्षेकरता युरोपीय देशांच्या धर्तीवर योजना तयार करण्यात आली. आगामी काही दिवसात बदललेल्या स्वरुपात, आधुनिक शस्त्र आणि उपकरणांनी सज्ज पोलीस जवान शहरात दिसून येतील. 39 जीटीसी, सीआरपीएफ आणि एनडीआरएफ याशिवाय पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षण देतील. जनतेसोबत चांगल्या वर्तनाची शिकवण देण्यासाठी बनारस हिंदू विद्यापीठाची मदत घेतली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असल्याने वाराणसीत सुरक्षेवर विशेष भर आहे. नव्या योजनेत 105 बाईक पथकांची स्थापना केली जातेय. गुन्हेगारी घटनेवर नजर ठेवणे आणि गुन्हेगारांना पकडण्याससह कोणत्याही आपत्कालीन स्थितीत घटनास्थळी पोहोचून प्रथमोपचारापासून वाहतूक कोंडी सोडविण्याची जबाबदारी या पथकांवर असेल असे पोलीस अधिकारी रामकृष्ण भारद्वाज म्हणाले.

पथकात सहभागी होणाऱया कर्मचाऱयांना 8 ते 11 सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण दिले जइा&ल. यानंतर त्यांना जीपीएस यंत्रणेने युक्त बाइकसह बॉडीकॅमेऱयाने सज्ज बुलेटप्रूफ जॅकेट, पिस्तुल, वायरलेस संच, बेडी आणि प्रथमोपचार साहित्य पुरविले जाईल. याशिवाय 25 जवानांना एटीएस मुख्यालयात कमांडो प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.

काळोखात देखील चमकेल खाकी

बाइक पथकाच्या पोलीस जवानांचे जॅकेट विशेष असेल. दिल्लीत तयार करविण्यात आलेल्या या जॅकेटवर ‘वाराणसी पोलीस’ लिहिलेली रेडियम पट्टी अंधारात देखील चमकेल. जॅकेटवर लावलेल्या कॅमेऱयाद्वारे प्रत्येक हालचालीची छायाचित्रे थेट पोलीस नियंत्रण कक्षात पोहोचतील.

सुरक्षा योजनेतील तरतुदी

नव्या सुरक्षा योजनेंतर्गत जैविक आणि रासायनिक हल्ल्याच्या स्थितीत जीव वाचविण्याकरता ‘प्रॉक्सिमिटी’, ‘अमोनिया’ आणि ‘ऍल्युमिनियम’ सूट्स वाराणसीत दाखल झाल्या आहेत. चौक ते गल्ल्यांपर्यंत नजर ठेवण्यासाठी उच्च दर्जाचे कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले. तसेच अत्याधिक वेगवान विदेशी नौका मागविण्यात आल्या आहेत.

Related posts: