|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गोकुळचा दूध टँकर चालक अपघातात ठार

गोकुळचा दूध टँकर चालक अपघातात ठार 

बोरगाव :

बोरगाव-सदलगा रस्त्यावर दूध टँकरला झालेल्या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे 3 च्या सुमारास घडली. यशवंत बैरागी (रा. हरळी बुद्रुक, ता. गडहिंग्लज) असे मृत चालकाचे नाव आहे. यशवंत हा गोकुळ दूध संघाच्या दूध संकलन करणाऱया टँकरवर चालक म्हणून सेवा बजावत होता.

 याबाबत सदलगा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, यशवंत बैरागे यांचे मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक आहे. यशवंत हे अनेक वर्षापासून वाहन चालक म्हणून काम करतात. गावामध्ये काम करण्यापेक्षा इतरत्र काम केल्यास अधिक पैसे मिळवू शकतो. या भावनेने यशवंत हे गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघात चालक म्हणून काम करीत होते. गुरुवारी पहाटे गोकुळ शिरगावहून येडूर येथील दूध संकलन केंद्रात दूध संकलनासाठी संघाची टँकर क्र. (एमएच 09 बीसी 1600) हा टँकर घेऊन बोरगावमार्गे निघाले होते.

 बोरगावहून काही अंतरावर असलेले निकम यांच्या शेताजवळ वळण घेत असताना अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्या बाजुच्या शेतवाडीत टँकर उलटला. यावेळी टँकर चालकाच्या बाजूने पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत यशवंत हे बोरगाव भागाकडे पहिल्यांदाच टँकर घेऊन आले होते. तसेच निकम यांच्या शेताशेजारी धोकादायक वळण असल्याने त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरण केले. पण याठिकाणी बाह्य वळणाचे दिशादर्शक फलक लावलेले नाही. यामुळे या वळणाचे चालकांना लक्षात येत नाही. या वळणावर अनेकवेळा अपघात घडले आहेत. याबाबत अनेकवेळा कळवूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. यांच्या दुर्लक्षामुळे टँकर चालकाचा बळी गेला असल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती. मृत यशवंतच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Related posts: