|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » Top News » खबरदार ! विमानात गैरवर्तन केल्यास होणार प्रवासबंदी

खबरदार ! विमानात गैरवर्तन केल्यास होणार प्रवासबंदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलेले आहे. मंत्रालयाकडून ‘नो-फ्लाय लिस्ट’ जारी करण्यात आली असून, विमानात गैरवर्तन करणाऱया प्रवाशांवर कायदेशीर आणि प्रवासबंदीची कारवाई करण्यात येणार असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी विमान प्रवासादरम्यान काही लोकप्रतिनिधींकडून विमान कर्मचाऱयाला मारहाण, विमानात गैरवर्तन अशा अनेक घटना घडल्या होत्या. मात्र, यावर विमान कंपन्यांकडून ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यानंतर आज नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ‘नो फ्लाय लिस्ट’ जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या नव्या नियमांतर्गत विमानात गैरवर्तन करण्याऱया संबंधित प्रवाशांवर विमान प्रवासबंदीची कारवाई होणार आहे.

Related posts: