|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » टाटा मोटर्स : जमशेदपूर प्रकल्पात संप

टाटा मोटर्स : जमशेदपूर प्रकल्पात संप 

वृत्तसंस्था/ जमशेदपूर

वेतनामध्ये विसंगती आढळून आल्याने जमशेदपूरमधील टाटा मोटर्सच्या कर्मचाऱयांनी बंद पाळला. झारखंड या प्रकल्पात गेल्या तीन दिवसांपासून हा संप चालू आहे. 5 सप्टेंबर रोजी कर्मचाऱयांना देण्यात आलेल्या पे स्लिपमध्ये अनियमितता आढळून आली. यानंतर बुधवारपासून कंपनीतील निम्म्यापेक्षा जास्त कर्मचारी संपावर गेले होते.

31 जुलैला कर्मचाऱयांना कंपनीकडून वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र 5 तारखेला मिळालेल्या स्लिपमध्ये ती दाखविण्यात न आल्याने कर्मचारी संपावर गेल्याचे सांगण्यात आले. मात्र कंपनीकडून याची तत्काळ दखल घेत कर्मचाऱयांना उर्वरित वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. तांत्रिक कारणास्तव ही चूक झाल्याचे टाटा मोटर्सकडून मान्य करण्यात आले. मात्र कर्मचाऱयांनी उर्वरित सहकाऱयांना कायमस्वरुपी भरती करण्याची मागणी केली. 500 कर्मचाऱयांना तत्काळ आणि 700 कर्मचाऱयांना वार्षिक कालावधीने कायमस्वरुपी करण्यात यावे अन्यथा शनिवारपासून उपोषण करण्यात येईल असे काही कर्मचाऱयांनी म्हटले आहे. कर्मचाऱयांच्या नव्या मागणी मान्य करण्यासाठी व्यवस्थापकीय पातळीवर बोलणी सुरू असल्याचे कंपनीने म्हटले.

Related posts: