|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » एकाच्या अवयवदानाने 8 जणांना जिवदान मिळते

एकाच्या अवयवदानाने 8 जणांना जिवदान मिळते 

वार्ताहर/ तुरंबे

 माणसाला मरणानंतरही जिवंत राहायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने अवयव दान करणे गरजेचे आहे. एका व्यक्तीने अवयव दान केल्यास 8 व्यक्तींना जीवदान मिळते. त्यांचे संसार फुलतात म्हणून अवयव दान हे श्रे÷ दान असल्याचे मत तालुका वैद्याकीय अधिकारी मिलिंद कदम यांनी केले. ते राधानगरी येथे आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या अवयव दान प्रबोधन रॅलीत बोलत होते.

  राधानगरी तालुक्मयातील आरोग्यविभाग आरोग्य विभाग आणि पंचायत समितीच्यावतीने अवयव दान प्रबोधन रॅलीचे आयोजन केले होते. प. स. सदस्य उत्तम पाटील आणि वंदना पाटील यांनी या रॅलीचे फित कापून शुभारंभ केला. यावेळी बोलताना तालुका वैद्यकीय अधिकारी मिलिंद कदम म्हणाले सध्या महाराष्ट्रात 4 हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. तर 500 रुग्णांना लिव्हर ची गरज आहे. याचबरोबर हृदय प्रत्यारोपनासाठी अनेक जन प्रतीक्षेत आहेत. माणसांना मृत्यूनंतरही जिवंत राहायचे असेल तर अवयव दान करणे काळाची गरज आहे. एका व्यक्तीच्या अवयव दानाने 8 व्यक्तींना जीवदान मिळते. त्याच्या कुटुंबांना आधार मिळतो. माणसाला किडनी, लिव्हर, डोळे, त्वचा, मेंदू, हृदय आदि अवयवांचे दान करता येते. राधानगरी तालुक्मयात 300 लोकांनी अवयव दानाचे फॉर्म भरले आहेत. यामध्ये दोघांनी मरणोत्तर नेत्रदान आणि एकाने देह दान केले आहे. आपण कोणाला काही देऊ शकलो नाही तरीही अवयव दानाने पिडितांना जीवन देऊ शकतो. यामुळे अवयव दान हे श्रे÷ असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनील कुरुंदवाडे म्हणाले ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामे झाले आहेत अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे. अवयवदानाचा फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसारच अवयव दान होणार आहे. समाजात या संदर्भात अजून गैरसमज आहेत. यावेळी गटविकास अधिकारी एस. डी. नाईक, विस्तार आधीकारी एस. बी. जाधव यांनीही अवयवदाणा संदर्भात प्रबोधन केले. तर आरोग्यविभागाच्या कर्मचाऱयांनी पंचायत समिती कार्यालयापासून रॅली काढत गावागावातून अवयवदाना संदर्भात प्रबोधन केले. यावेळी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी ए. एम. गुळवणी, आर. एस. पाटील, धनश्री पाटील, वनिता पाटील, साताप्पा मानुगडे, गजानन बिल्ले, डी. ए. पाटील यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे, आरोग्याविभागाचे आणि पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.