|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » मशिन्स असले तर ऑपरेटर नाहीत ; गडकरींचे आरोग्य विभागावर टीकास्त्र

मशिन्स असले तर ऑपरेटर नाहीत ; गडकरींचे आरोग्य विभागावर टीकास्त्र 

ऑनलाईन टीम / नागपूर :

आपल्या आरोग्य विभागात मशिन्स असले तर ऑपरेटर नाहीत आणि ऑपरेटर असले तर मेंटेनन्स नाही, अशी परिस्थिती असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आरोग्य विभागावर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, राज्यात नवनवीन आरोग्यासंदर्भात सोयी आणल्या जातात. मात्र, तुमच्या विभागात एकतर मशिन्स येत नाहीत. मशिन्स आलेत तर ऑपरेटर येत नाहीत. ऑपरेटर आले तर मेंटेनन्स नाही आणि मेंटेनन्स केले तर पैसे नाहीत, अशी व्यवस्था आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून गडकरी म्हणाले.