|Monday, October 22, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदी-योगींचे चित्र रेखाटल्याने महिला बेघर

मोदी-योगींचे चित्र रेखाटल्याने महिला बेघर 

पतीने काढले घराबाहेर :

बलिया/ वृत्तसंस्था

24 वर्षीय नगमा परवीन बोलू शकत नसली तरीही सुंदर चित्रांद्वारे ती व्यक्त होते. सर्वोच्च न्यायालयाद्वारे तिहेरी तलाकला घटनाबाह्य ठरविण्यात आल्यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र काढून पतीला दाखविले. पतीला हे चित्र दाखविणे नगमाला भारी पडले, सासरकडच्यांनी मारहाण करत वेडं ठरवून तिला घराबाहेर काढले. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या सिकंदरपूर येथील बसारिकपूर गावात घडली. सासरी मारहाणीनंतर नगमा माहेरी दाखल झाली असता तिचे वडिल मोहम्मद शमशेर खान यांनी पोलिसांकडे या घटनेची तक्रार नोंदविली.

नगमाचा विवाह परवेज खान याच्यासोबत 26 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता. हुंडय़ावरून सासरी तिचा छळ अगोदरपासूनच व्हायचा. तिहेरी तलाकचा निकाल लागल्यानंतर तिने मोदी आणि योगींचे चित्र रेखाटत ते पतीला दाखविले. तिचे हे कृत्य परवेज तसेच त्याच्या कुटुंबीयांच्या पचनी पडले नाही. सासरकडच्यांनी मारहाण करत तिला घराबाहेर काढले. मोदी आणि योगींचे चित्र काढल्याने तिला घरात राहण्याचा अधिकार नसल्याचे परवेजने म्हटले.

नगमाच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी चौकशी सुरू असून योग्य ती पावले उचलू असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related posts: