|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » होमिओपॅथी डॉक्टरांनी काणकोणातील किडनी रूग्णांचा प्रश्न हाती घ्यावा

होमिओपॅथी डॉक्टरांनी काणकोणातील किडनी रूग्णांचा प्रश्न हाती घ्यावा 

प्रतिनिधी / मडगाव

काणकोणात किडणी समस्या गंभीर बनली आहे. गेली कित्येक वर्षे या गंभीर आजाराचे मुळ कारण शोधून काढण्यात यश आलेले नाही. आज होमिओपॅथी उपचार पद्धती ही पर्यायी उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते. या क्षेत्रात काम करणाऱया होमिओपॅथी डॉक्टरांनी काणकोणमधील किडणी रूग्णांचा प्रश्न हाती घ्यावा असे उद्गार मंत्री विजय सरदेसाई यांनी काढले

मडगाव रवींद भवनात आयोजिंत केलेल्या होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. सरदेसाई बोलत होते. यावेळी डॉ. केतन भाटीकर, होमिओपॅथी संघटणेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भास्कर भट्ट, डॉ. रामजी सिंग, डॉ. भस्मे, डॉ. दिलीप कुमार रॉय इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

होमिओपॅथी उपचार पद्धती ही सुरक्षित मानली जात आहे. आज प्रभावीपणे तिचा वापर देखील केला जात आहे. काणकोणमधील किडनी आजारावर आज पर्यंत ठोस असे संशोधन झालेले नाही. किडनी आजार का निर्माण होते, त्याची कारणे शोधून काढणे महत्वाचे आहे. या पूर्वी संशोधनाचे प्रयत्न झाले, पण त्यांना ही ठोस असे कारण शोधून काढता आलेले नाही.

या होमिओपॅथी डॉक्टरांनी किडनी आजाराचे कारण शोधून काढतानाच, त्यावर प्रभावी होमिओपॅथी उपचार पद्धतीचा देखील वापर करावा असे आवाहन मंत्री श्री. सरदेसाई यांनी केले. जर यात होमिओपॅथी डॉक्टरांना यश आले तर काणकोणसहीत संपूर्ण राज्याला मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. केतन भाटीकर व इतरांची मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. आज या परिषदेचा समारोप होणार असून सकाळच्या सत्रात किडनी आजारावर खास परिसंवाद होणार आहे.

Related posts: