|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » रॅपर श्रेयश जाधवची फकाट पार्टीला सुरुवात

रॅपर श्रेयश जाधवची फकाट पार्टीला सुरुवात 

आम्ही पुणेरी आणि वीर मराठे या मराठमोळय़ा रॅपसाँगच्या घवघवीत यशानंतर खास आपल्या चाहत्यांसाठी मराठी रॅपर, किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव ‘फकाट पार्टी’ देत आहे. नुकतेच त्याचे हे गाणे लोकांसमोर सादर करण्यात आले असून, त्याच्या आतापर्यंतच्या सर्व रॅपसाँगप्रमाणे हे गाणेदेखील प्रेक्षकांना भरपूर आवडत आहे. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सादर होणाऱया या पार्टीसाँगला हर्ष, करण, आदित्य यांनी संगीत दिले असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन तसेच कॉरियोग्राफी केली आहे. श्रेयशने गायलेल्या या गाण्याचे वैशिष्टय़ म्हणजे यात 100 ग्लॅमरर्स मॉडेल्सना घेण्यात आले असून त्यात फॉरेनर्सचादेखील समावेश आहे.

‘फकाट पार्टी’ या नावातूनच या गाण्यातील धम्माल लक्षात येऊ शकते. मुळात रॅप साँग म्हटले तर डोळय़ासमोर एक वेगळाच नजारा उभा राहतो. हनी सिंग, रफ्तार, बादशाह यांच्या रॅप गाण्यातील एट पाहिली असता, तरुण वर्गाला त्यांची भुरळ पडली नाही तर नवलच. मात्र, श्रेयशने आतापर्यंत आम्ही पुणेरी आणि वीर मराठे या दोन गाण्यांमधून हार्डकोअर कॉन्टेन्टफुल रॅपचे एक वेगळे स्वरूप लोकांसमोर सादर केले होते. परंतु, त्याचे फकाट पार्टी हे रॅप साँग त्याहून अगदी वेगळे आणि पॉप गाण्याशी संलग्न असे आहे. श्रेयशच्या सगळय़ाच गाण्यांमध्ये इंग्रजी तसेच हिंदी रॅप साँगला साजेल असा रुबाब पाहायला मिळतो. मराठीतील या आगळय़ावेगळय़ा डिस्को रॅप साँगमध्ये आलिशान गाडय़ा, ग्लॅमरर्स मुली आणि चंगळ असे बरेच काही पाहायला मिळते. 

मराठी चित्रपटसफष्टीचा तरुण निर्माता, रॅप सिंगर व गीतकार म्हणून श्रेयशने आता चांगलाच जम बसवला असून त्याच्या एकामागोमाग एक हिट होत असलेल्या  त्याच्या रॅप साँगमुळे. श्रेयश हा मराठी पॉप इंडस्ट्रीमध्ये एक नवीन क्रांती आणतोय असे म्हणायला आता हरकत नाही.

Related posts: