|Thursday, May 24, 2018
You are here: Home » मनोरंजन » हर्बेरियमच्या दुसऱया पर्वाची घोषणा

हर्बेरियमच्या दुसऱया पर्वाची घोषणा 

सुबक या संस्थेद्वारे हर्बेरियम हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुनील बर्वे यांनी पाच वर्षापूर्वी हाती घेतला. मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली आणि गाजलेली काही चांगली नाटके हर्बेरियम या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आली. आजच्या तरुण पिढीला या नाटकांची माहिती व्हावी आणि रंगभूमीवर गाजलेली नाटके पुन्हा पहाता यावी, या उद्देशाने सुनील बर्वे यांनी हा उपक्रम राबविला होता. या अभिनव उपक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नाटकाच्या प्रयोगाच्या तिकीटांसाठी नाटय़रसिकांनी पहाटे लावलेल्या रांगा या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाची कल्पना देतात. सूर्याची पिल्ले, लहानपण देगा देवा, हमीदाबाईची कोठी, आंधळं दळतंय आणि झोपी गेलेला जागा झाला या पाच नाटकांचा हर्बेरियम उपक्रम 2012 मध्ये संपल्यानंतर अभिनेते सुनील बर्वे नवीन काय घेऊन येणार याकडे नाटय़रसिकांचेही डोळे लागले होते. आता बऱयाच प्रतीक्षेनंतर ही उत्सुकता संपणार असून हर्बेरियमच्या दुसऱया नव्या पर्वाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.

या दुसऱया पर्वाची घोषणा निर्माते सुनील बर्वे यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत केली. बॅकस्टेज आर्टिस्ट मधू दळवी यांच्या फोटोला पुष्पहार घालत ही पत्रकार परिषद सुरू करण्यात आली. माझ्या आजवरच्या यशात प्रेक्षकांच्या प्रेमाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच प्रेक्षक विनंतीला मान देत हर्बेरियमच दुसरं पर्व मी आणलं आहे, असे सुनील बर्वे यांनी यावेळी सांगितले. हर्बेरियम या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला लाभलेल्या उत्तम यशानंतर दुसऱया पर्वाचे स्वागत ही नाटय़रसिक जोरदार करतील आणि हे पर्वही नाटय़रसिकांना स्मरणरंजनाचा आनंद देईल, असा विश्वास सुनील बर्वे यांनी व्यक्त केला. हर्बेरियमचा उपक्रम राबवताना तो अभ्यासपूर्वक राबवायला हवा यासाठी सुनील बर्वे आग्रही होते. त्यासाठी विदेशी जाऊन जागतिक रंगभूमीचा आढावा घेतल्यानंतर आपला दृष्टीकोन बदलला असं सांगत हर्बेरियमच्या उपक्रमात याचा फायदा झाल्याचं सुनील बर्वे आवर्जून सांगतात. चांगल्या उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद दिग्दर्शक विजय पेंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, केदार शिंदे व कलाकार मफण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखील रत्नपारखी, धनंजय म्हसकर व सिद्धेश जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

 

हर्बेरियम उपक्रमाअंतर्गत सादर झालेल्या जुन्या नाटकांचे रसिक प्रेक्षकांनी भरभरून स्वागत केले होते. या पार्श्वभूमीवर हर्बेरियम पुन्हा एकदा रसिकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने या नव्या पर्वाची सुरुवात होईल. या नाटकाचं दिग्दर्शन विजय पेंकरे करणार आहेत. या पर्वातही पाच नाटकं असून विजय पेंकरे यांच्यासह चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, केदार शिंदे या मातब्बर दिग्दर्शकांची नाटकं या पर्वात सादर होणार आहेत. मुंबई व महाराष्ट्रात या नाटकांचे प्रयोग रंगतील. ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकात मफण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखील रत्नपारखी या कलावंतांसह धनंजय म्हसकर आणि सिद्धेश जाधव हे दोन नव्या दमाचे गायक कलावंत भूमिका करणार आहेत. याचे नेपथ्य प्रदीप मुळय़े यांचं असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांची असणार आहे. संगीत राहुल रानडे तर वेशभूषा मंगल पेंकरे यांची आहे. शनिवार 23 सप्टेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गफहात दुपारी 4 वाजता रंगणार आहे.

Related posts: