|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ातील माडी दुकानांची लिलाव प्रक्रिया पूर्ण

जिल्हय़ातील माडी दुकानांची लिलाव प्रक्रिया पूर्ण 

वार्ताहर/दाभोळ

रत्नागिरी येथील शासकीय अल्पबचत सभागृहात शुक्रवारी जिह्यातील माडी दुकानांच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली. यासाठी जिल्हय़ातील दापोली, मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, लांजा तसेच रत्नागिरी या तालुक्यांतून असंख्य माडी व्यावसायिक उपस्थित होते. 

   अप्पर जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संध्या राणे-देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेस सुरूवात झाली. दापोलीतील व्यावसायिकांच्या विनंतीनुसार दापोली तालुक्यातील दुकानांचे लिलाव प्रथम घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित तालुक्यातील दुकानांचे लिलाव करण्यात आले. जिह्यातून एकूण 343 दुकाने लिलावासाठी ठेवण्यात आली होती. मात्र वाढीव किंमतींमुळे व व्यावसायिकांच्या अनास्थेमुळे 146 दुकानांचे लिलाव स्थगित ठेवण्यात आले. स्थगित दुकानांचे फेरलिलाव पुढील महिन्यात होणार आहेत. लिलावात यशस्वी बोली झालेल्या 197 दुकानांमधून शासनाला सुमारे 99,20,500 रूपयांचा महसूल मिळाला. 

   यावर्षी 6 टक्के भाववाढ करून सरकारी बोली निश्चित करण्यात आली होती. सरकारी बोलीवर आणखी 500 रूपयांची वाढ करूनच बोलीधारकास दुकान देण्यात आले. सायंकाळपर्यंत लिलाव प्रक्रिया चालू होती. अप्पर जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील, तालुक्यातील निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱयांनी लिलाव प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी चोख कामगिरी बजावली. लिलाव प्रक्रिया यशस्वीपणे तसेच वेळेत पूर्ण झाल्यामुळे सर्वच बोलीधारक संतुष्ट होते. 

Related posts: