|Thursday, May 24, 2018
You are here: Home » Top News » दगडूशेठ चरणीही 25 हजारांच्या जुन्या नोटा !

दगडूशेठ चरणीही 25 हजारांच्या जुन्या नोटा ! 

ऑनलाईन टीम / पुणे :

गणेशोत्सावाचा काळात लालबागच्या राजाप्रमाणे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणीही जुन्या नोटा अर्पण केल्याचे समोर आले आहे. मंडळाने गणपतीसमोर ठेवलेली दानपेटी उघडल्यानंतर त्यात जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा सापडल्या आहेत.

जुन्या नोटांमधील रक्कम 25 हजाराच्या घरात असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीला साडेतीन कोटी रूपयांचे दान आले. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा पुन्हा जमा करण्यासाठी मुदत दिली होती. ज्यांना ही रक्कम मुदतीच्या आत जमा करणे शक्य झाले नाही अशा भक्तांनी या नोटा गणपती चरणी अर्पण केल्या आहेत.

 

Related posts: