|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तळवलीत घरावर वीज कोसळली!

तळवलीत घरावर वीज कोसळली! 

प्रतिनिधी /गुहागर

गुहागर तालुक्यात रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामध्ये तळवली-भडकंबा येथील घराच्या दरवाजावर वीज पडून दरवाजासह घरातील विजेचा बोर्ड जळून खाक झाला. यामध्ये 6 हजाराचे नुकसान झाले आहे.

या पावसाला जोर नसला तरी विजेच्या कडकडाटामुळे वीज गायब झाली होती. यातच सायंकाळी 7.30च्या दरम्यान तळवली-भडकंबा येथील रघुनाथ गायकर यांच्या घराच्या पडवीच्या दरवाजावर वीज कोसळली. यात दरवाजाला लागून असलेल्या भिंतीचे प्लास्टर उडवत विजेने आतमध्ये प्रवेश करून विजेचा बोर्ड जळून खाक झाला. मात्र घरातील मंडळी आतमध्ये असल्याने पडवीत आलेल्या विजेमुळे कोणतीही दुखापत झाली नाही. सोमवारी येथील तलाठी एस. बी. चौगुले यांनी गायकर यांच्या घराला भेट देऊन पंचनामा केला. गायकर यांचा दरवाजा, वीज बोर्ड धरून सुमारे 6 हजाराचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Related posts: