|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कर्जाला कंटाळून आसगावात शेतकऱयाची आत्महत्त्या

कर्जाला कंटाळून आसगावात शेतकऱयाची आत्महत्त्या 

प्रतिनिधी / चंदगड

कर्जदाराच्या तगादय़ाला कंटाळून आसगाव येथील परशराम लक्ष्मण गावडे (वय.41) याने विष प्राशन करून आत्महत्त्या केली. या प्रकरणी आरोपी रघुनाथ मारूती गावडे यास अटक करण्यात आली आहे.

परशराम लक्ष्मण गावडे याने रघुनाथ मारूती गावडे यांच्याकडून व्याजाने पैसे काढले होते. त्या पैशांच्या वसुलीसाठी तगादा सुरू होता. व्याजासह पैसे दे… अथवा जमिन नावावर करून दे, यासाठीच्या सततच्या तगादय़ाला कंटाळून परशराम लक्ष्मण गावडे याने आत्महत्त्या केल्याची फिर्याद धोंडीबा सुबराव गावडे यांनी चंदगड पोलीसात दिली आहे. गेल्या 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता परशराम गावडे याने तणनाशक प्याले होते. त्याच्यावर बेळगावच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असता सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या गुन्हय़ाचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.

Related posts: