|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तुळजापुरात शाळेचे छत कोसळले

तुळजापुरात शाळेचे छत कोसळले 

वार्ताहर / तुळजापुर

तालुक्यातील गंधोरा येथील जि. प. शाळेची धोकादायक बनलेल्या शाळेतील वर्ग खोली रविवारी झालेल्या भिज पावसात पडल्याने खडबडून जागे झालेल्या जि. प. शिक्षण विभागाने जिह्यातील सर्व केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, मुख्ययाधपक, गटशिक्षणधिकारी यांची तातडीची बैठक बोलवणयाचे औदार्य दाखवले आहे.

  तालुक्यातील तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या गंधोरा गावात जि.प. ची पहिली ते सातवीपर्यत शाळा आसुन, शाळेची ईमारत 1942 साली गावकऱयांनी लोकसहभागातुन बांधलेली आहे. शाळेची इमारत अखेरची घटका मोजत असुन, पूर्णपणे कालबाह्य व धोकादायक झाल्याने चार वर्षापासुन शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना धोक्याची घंटा वाजवत आसताना ही याकडे जि. प. शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे गंधोरा गाव माजी मंञी तथा आ. मधुकरराव चव्हाण यांनी दत्तक घेतले आहे. या शाळेची परिस्थिती तब्बल चार वर्षापासुन धोकादायक असताना प्रशासनाने इमारत धोकादायक असल्याचे सांगण्या पलीकड काहीच केले नाही. त्यामुळे आ. चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या गावातील शाळेची अशी अवस्था असेल तर इतर गावातील शाळेचा विचार न केलेलाच बरा.

  ऍड. दीपक आलुरे यांनी गंधोरा गावास भेट देऊन पाहणी केली आहे. माञ, सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडली आहे. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र,  घटनेचे वृत्त समजताच खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागने जिह्यातील सर्व शाळेच्या केंद्र प्रमुखांकडून माहिती घेतली. शाळा बांधकामासाठी 31 लाख 8 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परंतु शाळा पाडण्यासाठी परवानगी न मिळाल्याने ती अद्याप पाडली नव्हती. सोमवारी विद्यार्थ्यांना मैदानावर बसण्याची वेळ आली होती.

Related posts: