|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार : राहूल गांधी

पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार : राहूल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार असलयाचे राहूल गांधी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची तायरी राहूल गांधी यांनी पहिल्यांदाच दर्शवली आहे.

नोटाबंदी, वाढता हिंसाचार, जीएसटी यासह अनेक मुद्यांवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी भारतात डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया आहे’अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले. ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बर्कलेमध्ये बोलत होते.