|Thursday, May 24, 2018
You are here: Home » Top News » मुंबईत उष्णता वाढली ,पण परतीचा पाऊस बरसणार

मुंबईत उष्णता वाढली ,पण परतीचा पाऊस बरसणार 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पावसाळयाचा अखेरच महिना असला तरी आतापासूनच मुंबई तापायला सुरू झाली आहे. मुंबईतील तापमानाचा पारा 35च्या घरात पोहोचला आहे. सोमवारी मुंबईचे तापमान तब्बल 35.5अंश सेल्सिअस होते.

गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापेक्षा यंदाच्या वर्षातले हे सर्वाधिक तापमान होते. काल मुंबईचे तापमान नेहमीपेक्षा 5 अंशांनी जास्त होता. हा पारा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. वातावरणातील आर्द्रता कुलाबा भागात 87टक्के तर सांताक्रूझ भागात 75 टक्के होती.तर हवामान विभागाच्यामते मान्सूनमुळे सध्या वातावरणात आर्द्रता आधीच अस्तित्वात आहे. आणि त्यात हवेतला कोरडेपणा आणि आर्द्रता यामुळे मुंबईत ऑक्टोबर हिट सारखी परिस्थिती निर्माण होत आहे.

 

Related posts: