|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » भिवंडीजवळ बस आणि गाडीचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

भिवंडीजवळ बस आणि गाडीचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / ठाणे :

भिवंडीतील मानकोलीजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. टीएमटीची बस आणि एक स्विफ्ट डिझायर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जार जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. या अपघातानंतर परिसरात वाहतूक खोळंबली असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.

ठाणे – नाशिक महामार्गावर आज सकाळी हा अपघात झाला. या मार्गावरून जाणाऱया कारचालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकावरून विरूद्ध दिशेला जाणाऱया टीएमटी बसला धडकला. त्यामुळे झालेल्या अपघातात जार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. जखमी झालेल्या दोन जणांना मुंबईतील जे. जे. रूग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेतील मृताची व जखमींची ओळख पटली नसून पोलिसांकडून तपास केला जात आहे.

 

Related posts: