|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिरोळ श्री दत्त कारखान्याच्या वार्षिक सभेची जय्यत तयारी सुरू

शिरोळ श्री दत्त कारखान्याच्या वार्षिक सभेची जय्यत तयारी सुरू 

प्रतिनिधी/ शिरोळ

येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून कारखाना कार्यस्थळावर भव्य सभा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेसाठी ऊस उत्पादक सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता गृहित धरून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी ऊर्जाकुर प्रकल्प कारखान्याचा मालकीचा करून कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे दाखवून दिले 147 कोटी रूपयांचा 36 मॅग्यावेट वीज निर्मितीचा प्रकल्प कारखान्याचा मालकीचा करण्याचा धाडसी निर्णय व्यवस्थापक मंडळाने घेतला आहे. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील फौंडेशनच्यावतीने गणपतराव पाटील यांनी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचा सभासदांच्यावतीने नागरी सत्कार करण्याचा नियोजन कार्यकर्त्यांनी केला आहे. ऊस उत्पादक सभासदांना व कर्मचाऱयांच्या हिताकरिता नवनवीन प्रयोग व्यवस्थापक मंडळ राबवित आहे. ऊस उत्पादक सभासदांना प्रोत्साहनपर बक्षिस बरोबर बी-बीयाणे, खते उपलब्ध करून दिली जात आहेत.

अति रासायनिक खतांच्या वापरामुळे शेत जमिनी नापिक बनत चालली आहे. त्याकरीता कारखान्याच्यावतीने गणपतराव पाटील यांनी सेंद्रीय शेती व गाय संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यास सभासदांनी प्रतिसाद चांगला दिला आहे. सेंद्रीय शेतीपासून जास्तीत जास्त एकरी उढस उत्पादन घेणाऱया शेतकरी सभासदांच्याकरिता बक्षिस योजनाही त्यांनी नुकतीच जाहीर केली आहे. गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वी रित्या सांभाळून वेगवेगळे प्रयोग सभासद व कर्मचारी वर्गासाठी राबवली जात आहे. त्यांनी नियोजनबद्ध कारभार करीत असल्याने ऊस उत्पादक सभासदामधून त्यांचे कौतुक होत आहे.

Related posts: