|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रत्येक व्यक्तीने नेहमी विद्यार्थी रहावे : सदाशिव वाईंगडे

प्रत्येक व्यक्तीने नेहमी विद्यार्थी रहावे : सदाशिव वाईंगडे 

वार्ताहर/ हुपरी

प्रत्येक व्यक्तीने नेहमी विद्यार्थी राहिले पाहिजे, तरच ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते, असे प्रतिपादन सदाशिव वाईंगडे यांनी केले.

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील जाधव इंग्लिश स्कूलमध्ये 1983 एसएससी बॅच गुरू-शिष्य स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. डी. जामकर होते. प्रमुख उपस्थितीत निवृत्त पोलीस डीवायएसपी नारायण मोठे-देसाई तसेच व्यासपीठावर कलंदर जमादार, अशोक डवरी. पी. ए. पाटील, सौ. पुष्पा देसाई, गणपती तोडकर, विजय माने, आनंदा आवटे, नाभिराज गंगाई, कलंदर जमादार आदी उपस्थित होते.

यावेळी पी. ए. पाटील, विजय माने, सौ. पुष्पा देसाई, अशोक डवरी, के. डी. जामकर, साताप्पा भवान, डॉ. कुबेर मिठारी, चंद्रशेखर देशपांडे, शिला कांबळे, बबन पाटील, नारायण मोठे-देसाई, मेघासाने घाणेकर, राघू नेहरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत बापू जाधव यांनी तर संजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सदानंद अनुरे, आनंदा आवटे, बबन पाटील, बहूबली मंडपे, संजय कांबळे, राजेंद्र जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले. सौ. उर्मिला देसाई व संजय आडके यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन खुडे यांनी आभार मानले.

Related posts: