|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » 4हजार 637 क्युसेस पाणी नीरा नदी पत्रात

4हजार 637 क्युसेस पाणी नीरा नदी पत्रात 

वार्ताहर/ लोणंद

सातारा व पुणे जिल्हयाच्या सीमेवर असणाया वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन तीन दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे वीर धरण 100 टक्के भरले असून सोमवारी रात्री 1 वाजता वीर धरणाचा एक दरवाजा चार फुटाने उचलुन 4हजार 637 क्युसेस पाणी नीरा नदी पत्रात पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती वीर धरण अभियंता अजित जमदाडे यांनी दिली.

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे नीरा खोयात असलेली भाटघर,नीरा देवधर,गुंजवणी ही सर्व धरणे शंभर टक्के गत महिन्यात भरली आहेत, वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेल्या भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आज अखेर एकूण  586 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असुन  सोमवारी 8 मिलिमीटर इतका पाऊस झाला हे धरण 100 टक्के भरले आहे. तर नीरा देवघर धरण देखील 100 टक्के भरले असुन सोमवारी या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात 6 मिलिमीटर पाऊस झाला असुन आज अखेर एकूण 1950 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर वीर धरणात सोमवारी रात्री 100 टक्के भरले असुन वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी 29 मिलीमीटर पाऊस झाला असुन आज अखेर एकूण 242 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.

Related posts: