|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिर्के शाळा परिसरातील पाणीपुरवठा केला सुरळीत

शिर्के शाळा परिसरातील पाणीपुरवठा केला सुरळीत 

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील शिर्के शाळा परिसरात पाणीपुरवठा वारंवार खंडीत व कमी दाबाने होत होता. संबंधित विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर त्या ठिकाणी गणेशोत्वाचा मंडप उभा होता. त्यामुळे पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी नागरिकांशी समन्वय साधला. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्याचबरोबर गणेशोत्सव संपताच पाईपलाईन तातडीने दुरुस्त करुन पाणीपुरवठा सुरळीत केला. याकामी त्यांना नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्षांचे मार्गदर्शन लाभले. 

   शहरातील शिर्के शाळा, डिलक्स लॉड्री परिसरामध्ये पाणीपुरवठा खंडीत झाला होता. तसेच पाणी कमी दाबाने येत असल्याने परिसरातील पाणी प्रश्न नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, पाणीपुरवठा सभापती यांच्यासमोर मांडण्यात आला. याप्रश्नी नगराध्यक्षाच्या दालनामध्ये बैठक झाली. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी दुरुस्तीचे काम करण्यास सुरुवात करतेवेळी कामाच्या ठिकाणी गणेशोत्सव मंडप असल्याने हे काम तात्काळ करता आले नाही. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी पालिकेमार्फत 15 दिवस सतत टँकरने पाणी पुरवण्यात आले. गणेशोत्सव संपल्यानंतर नगरपालिकेने काम हाती घेतले असता, पाईपलाईनमध्ये सेंट्रींगच्या फळ्या कुजलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळेच या भागात कमी दाबाने आणि वारंवार पाणीपुरवठा खंडीत होत होता. पाणीपुरवठा सभापती राजेशिर्के यांनी स्वतः लक्ष घालून पाईपलाईन दुरुस्त करुन घेतली त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. नगरपालिकेने पाणीपुरवठा सुरळीत केल्याने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा सभापतींना धन्यवाद दिले आहेत. 

   हे काम करत असताना मुख्याधिकारी शंकर गोरे, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, नगरसेवक यशोधन नारकर यांनी मार्गदर्शन केले.

 

Related posts: