|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बैठकीच्या पूर्वसंध्येला मनपा आयुक्तांची बदली

बैठकीच्या पूर्वसंध्येला मनपा आयुक्तांची बदली 

प्रतिनिधी/ पणजी

बायंगिणी येथील मनपाच्या जमिनीबाबत आज बुधवारी मनपाची महत्त्वाची बैठक बोलाविली असताना तिच्या पूर्वसंध्येला सरकारने महापालिका आयुक्त दीपक देसाई यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी आयएएस अधिकारी अजित रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनपाची सुमारे 1 लाख 71 हजार चौ.मी. जमीन सरकारला कचराप्रक्रिया प्रकल्पासाठी देण्यात यावी, अशी सूचना करणारे पत्र नुकतेच मनपाला नगरविकास संचालकाने पाठविले आहे. मंत्रिमंडळ बैठक घेऊन तसा प्रस्ताव संमत केल्याचेही मनपाला कळविण्यात आले आहे. यामुळे काल मंगळवारी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पत्रकार परिषद घेऊन मनपाची जमीन सरकारच्या ताब्यात देणार नसल्याचे स्पष्ट केलेच. त्याचबरोबर प्रकल्पासाठी आवश्यक तेवढीच जमीन देण्याची तयारी दर्शविली, मात्र त्यासाठी सरकारने त्रिपक्षीय करार करावा, असे स्पष्ट केले आहे. या विषयावरून आज बुधवारी संध्याकाळी महापौरांनी महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. मात्र ही बैठक होण्याअगोदरच आदल्याचदिवशी सरकारने आयुक्त दीपक देसाई यांचीच बदली केली. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय लढाईचे स्वरुप आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Related posts: