|Thursday, May 24, 2018
You are here: Home » Top News » दाऊदला झटका ; ब्रिटनमधील चार हजार कोटींची संपत्ती जप्त

दाऊदला झटका ; ब्रिटनमधील चार हजार कोटींची संपत्ती जप्त 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड, अंडरवर्ल्डचा म्होरक्या दाऊद इब्राहिमची ब्रिटनमध्घल तब्बल 6.7 अब्ज डॉलर्स संपत्ती जप्त करण्यात आल्याचे कळते. भारतीय चलनानुसार या मालमत्तेची किंमत 4 हजार कोटी इतकी होते. या कारवाईमुळे तपास यंत्रणांनी दाऊदच्या नाडय़ा आवळण्यास सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

वॉरविकसायरमधील एक हॉटेल आणि अनेक घरे दाऊद इब्राहिमच्या नावावर होती. त्यावर ब्रिटनमधील तपास यंत्रणांनी टाच आणली आहे.ब्रिटनने जारी केलेल्या यादीनुसार, कासकर दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानमधील ठिकाणांचे पत्ते हाऊस नं. 37 मार्ग क्रमांक 30, डिफेंस हाऊसिंग अथॉरिटी , कारची, पाकिस्तान आणि सौदी मस्जिदजवळ लिफ्टन या पत्त्यांचा समावेश आहे. फोर्ब्स मॅगझिननुसार जगातील मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती 6.7अब्ज डॉलर एवढी आहे. दाऊद इब्राहिम हा जगातील क्रमांक दोनचा सर्वाधिक श्रीमंत असा डॉन असल्याचे मानले जाते.

 

Related posts: