|Thursday, May 24, 2018
You are here: Home » Top News » खाण्यापिण्याचा हिंदुत्त्वाशी संबंध नाही : मोहन भागवत

खाण्यापिण्याचा हिंदुत्त्वाशी संबंध नाही : मोहन भागवत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोणी काय खावे आणि कोण कोणता पेहराव करावा याच्याशी हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही . दुसऱया व्यक्तीला आहे. त्या स्वरूपात स्वीकारणे हे हिंदुत्त्व आहे ,असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचलक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे.

असहिष्णुता व संस्कृती रक्षणावरून देशात सध्या सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. भाजपचे सरचिटणीस राम यांच्या ‘इंडिया फाउंडेशन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जगातील सुमारे 50 देशांचे राजदूत व राजकीय तज्ञ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सध्याच्या राजकीय आणि सोशल मिडीयावरील वादावर भागवत यांनी यावेळी परखड भष्य केले. सोशल मीडियातून होणाऱया ट्रोलिंग या प्रकारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे.

 

Related posts: