|Thursday, May 24, 2018
You are here: Home » leadingnews » मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून, या उपसमितीमध्ये 5 सदस्य असणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष असतील.

मुंबईत 9 ऑगस्टला मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मराठा समाजाचे असंख्य बांधव सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा समावेश असणार आहे.

Related posts: